बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात असा वणवा पेटवू की त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे”

पुणे | बैलगाडा शर्यतीला बंदी असली तरी बैलगाडा मालकांनी शर्यत सुरू करण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत. अशातच शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शर्यत सुरू करण्यासाठी हालचाल केली आहे. महाराष्ट्रात असा वणवा पेटवू की त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे, असं डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

बैलगाडा शर्यतबंदी उठवण्याच्या आंदोलनामध्ये कोणताही श्रेयवाद नको, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामुहीक प्रयत्नातून हा लढा यशस्वी करायचा आहे. त्यासाठी माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना देखील बैठकीला येण्यासाठी फोन करून विनंती केल्याचं अमोल कोल्हे यांनी यांनी सांगितलं.

आंदोलन करायचं आहे पण नेमकं कोणा विरोधात करायचं. आपला आवाज नेमका कोणाच्या कानापर्यंत गेला पाहीजे. अचूक वेळ आणि अचूक ठिकाण ठरविण्यासाठी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्रात असा वणवा पेटवू की त्याची धग दिल्लीला पोहोचली पाहीजे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी वाट्टेल ती राजकीय किंमत मोजायला तयार आहे. काहीही झाले तरी चालेल पण जनतेला दिलेल्या शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन हे विघ्नहर्ता गणरायांच्या साक्षीने सांगतो, असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांनी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आमदार अतुल बेनके, पुरंदरचे आमदार संजय जगताप, मावळचे आमदार सुनिल शेळके इ. नेते आणि सर्व तालुक्यातील बैलगाडा संघटनांचे पदाधिकारी प्रमुख गाडा मालक उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम- दत्तात्रय भरणे

‘बचपन का प्यार’ गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

धोनीने 7 वाजता 29 मिनिटांनी का घेतली होती निवृत्ती?, समोर आलं ‘हे’ खास कारण!

पत्नीला किस करायला गेला अन् पँटच आली खाली, नवरदेवाच्या उडालेल्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या आठच दिवसानंतर नववधूने सासरच्यांना लुटलं अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More