Amol Kolhe | लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे शरद पवार यांच्या गटात जाणार की अजित पवार यांच्यासोबत जाणार याबाबतीत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं. तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता अजित पवार यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना लोकसभा निवडणुकीत पाडणार असल्याचं ओपन चॅलेंज दिलं होतं.
अजित पवार यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडणार असल्याचं आव्हान दिलं होतं. ते म्हणाले की, शिरूरमधून आम्हीच अमोल कोल्हे यांना निवडून दिलं होतं. आता अमोल कोल्हे कसे निवडून येतील हे पाहतोच. असा तगडा उमेदवार देऊन अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर आता अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवार यांना विजयानंतर जशाचं तसं उत्तर दिलं आहे.
अजितदादांच्या आव्हानावर अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर
अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात विजयी झाले आहेत. यावेळी अमोल कोल्हे यांनी माध्यमांसोबत बोलत असताना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या सारख्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व शिलेदारांनी हिरिरीने किल्ला लढवला, त्या प्रत्येकाचा हा विजय असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
“शरद पवार यांच्याबाबत आदर वाढलाय”
स्वत: लोकसभा निवडणूक लढवत असताना सहा सहा मतदारसंघात जाऊन सभा करणं, थोडं रिस्क असल्याचं अनेक नेत्यानं सांगितलं होतं, पण माझा प्रामाणिक हेतू होता. कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार हे संघर्ष करत होते. त्यामध्ये माझा खारीचा वाटा म्हणून मी काम करत होतो, असं अमोल कोल्हे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची आजची कामगिरी पाहून उर भरून आला आहे. यामुळे शरद पवार यांच्याबाबत आदर वाढलाय, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
News Title – Amol Kolhe Shirur loksabha Election News Update
महत्त्वाच्या बातम्या
फडणवीसांना जोर का झटका! माढयात मोहिते पाटील विजयी पथावर
भाजपवाले कोणाचेच नाहीत; संजय राऊतांच विधान चर्चेत
‘बच्चा बडा हो गया’, सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं