बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी…’; अमोल कोल्हे संतापले

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका करत अभिनेत्री केतकी चितळेंनं (Ketaki Chitale) नव्या वादाला तोंड फोडलं आहे. लबाडाचा लबाड, तुला ब्राम्हणांचा मत्सर, तू तर मच्छर अशा खालच्या शब्दात केतकी चितळेनं पवारांवर निशाणा साधला.

केतकी चितळेने केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केतकी चितळेच्या पोस्टवरून तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

साहेबांबद्दल गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध, अशा तीव्र शब्दात अमोल कोल्हेंनी टीका केली आहे. विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी साहेबांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा स्वत:ला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा, असं म्हणत अमोल कोल्हेंनी सुनावलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रात शरद पवारांचं योगदान मोलाचं आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. अमोल कोल्हेंनी ट्विट करत शरद पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट; ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

‘उद्धव ठाकरे म्हणजे…’; नवनीत राणांच्या वक्तव्याने खळबळ

“बूस्टर डोस नाही पण आमचा प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो”

“उद्धवजी, हिंमत करा आणि टोमण्या पलीकडची कृती आज कराच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More