बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”

मुंबई | देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत पण अद्यापही महाराष्ट्रातील नेता पंतप्रधान (Prime Minister) होवू शकला नाही. महाराष्ट्रातील पंतप्रधान पदाच्या सर्वात जवळ गेलेला नेता शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) आहेत असं नेहमीच बोललं जातं. अशातच आता पुन्हा महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान व्हावी अशी चर्चा सुरू झाली आहे. अन् त्याला निमित्त ठरलं आहे ते म्हणजे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी केलेलं भाषण होय.

खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशाला आज पवार साहेबांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. 26 खासदार असणाऱ्या गुजरातमधील असणारी व्यक्ती पंतप्रधान बनू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील महाराजांचा मावळा हा सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही, हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असं कोल्हे म्हणाले आहेत.

अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणादरम्यान युद्ध, रणनिती, सेनापती, कुरूक्षेत्र या शब्दांचा वापर केला आहे. आज देशाची परिस्थिती कुरूक्षेत्रासारखी आहे. 25-30 वर्षांनंतरचा महाराष्ट्र तसेच देश आपल्याला कसा हवा, याचा विचार करायला हवा. तुम्ही आणि मी भाग्यवंत आहोत की, या लढाईसाठी, मार्गदर्शनासाठी सेनापती म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या रुपाने खंबीर नेतृत्व आपल्यासोबत आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कलाकृती रूपेरी पडद्यावर साकारली आहे. त्यांच्या भाषणातून इतिहासाची झलक आणि भाजपच्या सत्तेविरूद्धचा रोष स्पष्टपणे जावणत होता हे मात्र नक्की.

थोडक्यात बातम्या 

“पवार साहेबांनीच शेतकऱ्यांना हमीभाव दुप्पट चौपट करून दिला”

“राजकारणात असूनही हवेत गप्पा न मारणारे नेते म्हणजे शरद पवार”

धक्कादायक! एकाच दिवसात घेतली तब्बल ‘इतक्या’ वेळा कोरोना लस

“गोपीनाथ मुंडेंच्या तोडीचा एकही नेता आज भाजपत नाही”

“विवाहबाह्य लैंगिग संबंध ठेवणे म्हणजे गंभीर पाप नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More