बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काल निवडून आलेला पोरगा 12 वेळा संसदेत बोलला आणि तुम्ही…’; अमोल कोल्हेंचा आढळरावांना टोला

पुणे | माझ्यावर कुणी आरोप करत असेल तर त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. आपल्या पहिल्या टर्ममध्ये आपण संसदेत किती वेळा बोललो होतो हे आठवावं. कालचा पोरगा संसदेत निवडून आला, तो एका वर्षात बारा वेळा बोलतो आणि तीन टर्म खासदार राहिलेला पाच वर्षात 8 वेळा बोलत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे, असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी शिवसेना नेते आढळराव पाटलांना लगावलाय.

अमोल कोल्हे हे मतदारसंघात भेटत नसल्याचा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील आणि विरोधकांकडून सतत केला जातो. यालाच अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर देत आढळराव पाटलांवर निशाणा साधलाय.

तुम्हाला संसदेत बाजू मांडण्याचं काम आहे. बोलायचंय त्यांना बोलू द्या, आपण आपलं काम करत राहायचं, असंही कोल्हे म्हणाले. तसंच शिरुरच्या जनतेसाठी मागील एक वर्षात चांगलं काम करायला मिळालं याचा मनोमन आनंद आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

रंगभूमीच्या पटलावरची भूमिका ही स्वतःला मनाप्रमाणे करता येते, मात्र राजकीय भूमिका ही मतदारांच्या मनाप्रमाणे साकारावी लागते, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.

 महत्वाच्या बातम्या-

मालाड येथे प्लायवूड आणि लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग

“सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार”

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंना विधान परिषदेवर संधी!

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द; या 12 नावांचा समावेश

अर्णब गोस्वामींना दिलासा नाही; आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More