सांगली | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.
विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावं, असा टोला अमोल कोल्हे यांनी भाजपला लगावला आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.
आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना किती नैतिकता पाळली होती?. असा सवाल अमोल कोल्हे यांनी भाजपला केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि औरंगाबादचे नामांतर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आज जे विरोधात आहेत. त्यांच्याकडे कदाचित आरसे शिल्लक नसावेत. त्यांनी जर आरशात पाहिले तर त्यांच्या मागण्या रास्त आहेत हे त्यांना कधीच वाटणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
थोडक्यात बातम्या-
“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”
‘प्यार किया तो डरना क्या’; या शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण
‘…तर नियमाप्रमाणं धनंजय मुंडे यांना शिक्षा व्हावी’; चित्रा वाघ आक्रमक
अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!
कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही- जयंत पाटील