“इंदिरा गांधींनंतर सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झाल्यानंतर आभार ठरावावर बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी लोकसभेत जोरदार भाषण केलं आहे. यावेळी बोलताना अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनंतर सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असं म्हणत अमोल कोल्हेंनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.

अमोल कोल्हेंनी मोदींचं कौतुक करत केंद्र सरकारवर निशाणा देखील साधला आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारकडे महत्त्वाची मागणी देखील केली आहे. शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्याची मागणी कोल्हेंनी मोदींकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या पुण्यातील जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्याची मागणी अनेक संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता स्थानिक खासदार अमोल कोल्हे यांनी या मुद्द्यावर थेट लोकसभेत आवाज उठवला आहे.

दरम्यान, पुरातत्व खात्याच्या नियमामुळं कोणत्याही गडकिल्लावर भगवा ध्वज फडकावला जाऊ शकत नाही, हा नियमच बदलण्यात यावा, अशी विनंती अमोल कोल्हेंनी लोकसभेत सरकारकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-