बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवारसाहेबांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका”

पुणे | शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. भोसरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

आपणाला शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पहायचे असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालावायला लागू नये अशी माझी भावना असल्याचं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे.

अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तर इथल्या नेत्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता इथे ताकत वाढवली पाहिजे, असंही ते म्हणाले.

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार 13 ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 तारखेला मेळावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी स्थानिक नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

थोडक्यात बातम्या- 

भारतीय रेल्वेने भंगार विकून कमावले कोट्यवधी रुपये; आकडा वाचून थक्क व्हाल

“अन्याय सहन करूनही फक्त पवारसाहेबांवर असलेल्या प्रेमापोटी राष्ट्रवादीबरोबर आहे”

महत्वाची बातमी! आता वाहनांची कागदपत्रे 31 ऑक्टोबरपर्यंतच वैध, वाचा सविस्तर

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

IPL 2021: केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, अखेर पंजाब किंग्सने सामना 5 विकेट्सने खिशात घातला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More