महाराष्ट्र मुंबई

…तेव्हा इथल्या गवतालाही भाले फुटतात हा देखील इतिहास आहे- अमोल कोल्हे

मुंबई | सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात घेतलेल्या शरद पवारांच्या त्या सभेला आज वर्ष पूर्ण झालं आहे. पवारांनी गेल्या वर्षी भर पावसात लोकांना संबोधित केलं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या सभेच्या आठवणी जागवल्या जात आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनींही शरद पवार यांच्या या सभेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

दिल्लीच्या तख्तापुढे कधीही न झुकणाऱ्या स्वाभिमानी माणसांचा हा महाराष्ट्र आहे. जेव्हा हिमालय अडचणीत येतो तेव्हा त्याला सह्याद्रीची आठवण येते हा इतिहास आहे.पण जेव्हा सह्याद्रीलाच आव्हानं दिली जातात तेव्हा इथल्या गवतालाही भाले फुटतात हा देखील इतिहास आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

“राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी”

आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीष महाजन आता कुठे गेले?; गुलाबराव पाटील यांचा सवाल

तेरावं आणि श्राद्ध घातल्यानंतर ‘तो’ एक दिवस अचानक घरी परतला, अन्

‘ते म्हणाले शरद पवार संपले पण…’; शरद पवारांच्या त्या सभेवरून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या