बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल कोल्हेंनी घेतला समाचार

मुंबई | केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलं होतं. राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यामातून बालपणात शिवाजी महाराजांना डावपेच शिकवले होते, म्हणून पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले, असा वक्तव्य राजनाथ सिंह यांनी पुण्यात केलं होतं. यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे.

रयतेसाठी निर्माण केलेल्या राज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जननायक ठरले होते. जर आपण इतिहासातील कागदपत्रे तपासली तर सुरूवातीच्या काळात स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यांच्यापाठी होती, असं कोल्हे यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची पहिली भेट 1671 सालच्या आसपास झाल्याची कागदपत्रात नोंद आहे. तेव्हा तर स्वराज्य अस्तित्वात आलेलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राजनाथ सिंह यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीच्या ऐकण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर केलं आहे, अशी शक्यता कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आपला ज्वलंत इतिहास हा नि:पक्षपातीपणाने सांगावा. अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी न मारण्याचा प्रयत्न करावा. शिवाजी महाराजांचा इतिहास हा राज्यांबरोबर देश आणि जगभरात सांगण्याची गरज आहे, असल्याचं मतही कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी ठाकरे… माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलंय”

‘हा पठ्ठ्या बघा…’; भर कार्यक्रमात अजित पवारांची टोलेबाजी

राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

महापालिका जिंकायचीच, संजय राऊतांनी टाकलं पहिलं पाऊल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More