पुणे | प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणरी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करणार असल्याच्या अफवा सोशल माध्यमांवर चांगल्याच रंगल्या आहेत. यावर मालिकेतील संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
गेले काही दिवस ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशलमीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नसल्याचं कोल्हें यांनी मांडलं आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसंदर्भात अनेक पोस्ट फिरत आहेत. टीका करण्यासाठी सरसावलेल्या तथाकथित बोरूबहाद्दरांनी आणि मळमळ असह्य होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सोशल मीडिया पंडितांनी मालिका पुर्ण पहावी. मग प्रेक्षक नात्याने टिप्पणी करावी, असं कोल्हेंनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो शेअर करत अफवा पसरावणाऱ्यांना सज्जड भाषेत चांगलाच दम भरला आहे.
दरम्यान, एक प्रवास कधीच न विसरता येणारा…, असं ट्विट करत कोल्हेंनी मालिका आता अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं होतं.
गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय
प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही. pic.twitter.com/bpA8bNhHti
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 5, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
संभाजी राजेंची मालिका संपताना अमोल कोल्हे भावूक…. केला हा खास व्हिडीओ ट्विट!
डॅडींना पुन्हा सुट्टीवर जायचंय; जाणून घ्या कारण…
मोदींनी राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा करताच उद्धव ठाकरे म्हणाले…
Comments are closed.