Top News

अभिनेते अमोल कोल्हे लवकरच राष्ट्रवादीत?; शिरुरमधून लोकसभा लढण्याची शक्यता

मुंबई | प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे लवकरच शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

अमोल कोल्हे यांनी नुकतीच प्रवीण गायकवाड यांच्या समवेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील सध्या खासदार आहेत. राष्ट्रवादीने या मतदारसंघात अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

अमोल कोल्हे यांना जर राष्ट्रवादीने शिरुरमधून उमेदवारी दिली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठी टक्कर मिळू शकते. 

महत्वाच्या बातम्या-

-जरा तरी लाज बाळगा, भाजप नेत्याला अभिनेत्रींनी फटकारले

माढ्यातून पवारांविरोधात भाजपचा ‘हा’ तगडा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात?

अभिनंदन यांच्या सुटकेवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आनंद!

भारतीय लष्कराकडून कारवाईचे पुरावे सादर, पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला!

… तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू- भारतीय लष्कर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या