भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे(Amol Kolhe) हे भाजपमध्ये(BJP) प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळं अमोल कोल्हे यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

आता या सगळ्या चर्चांणा पूर्णविराम लागला आहे, कारण अमोल कोल्हे यांनी यावर मौन सोडलं आहे. कोल्हे म्हणाले की, जर माझ्या संसदेतील भाषणानंतरही लोकांना असा प्रश्न पडत असेल तर लोकांनी संसदेतील माझे भाषण पूर्ण ऐकावे.

राज्याच्या किंवा देशाच्या विकसासाठी सत्ताधारी किंवा विरोधक असं काही नसतं. अनेक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजित पवारांनी(Ajit Pawar) मदत केली आहे, असंही कोल्हे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी मी सादर केलेल्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, म्हणून राजकीय चर्चा किंवा पक्ष बदलणार या चर्चांणा काही अर्थ नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मी विकासासाठी काम करत राहील, असंही कोल्हे म्हणाले.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भागातील प्रकल्पांसाठी फडणवीसांची काही वेळा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या होत्या, त्यामुळं राजकीय वर्तुळात अशा चर्चा रंगल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-