बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राईचा पर्वत करण्याची गरज नाही’; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

नवी दिल्ली |  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद असं वक्तव्य शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी केलं होतं. यावरून महाविकास आघाडीतील्या पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. अशातच अमोल कोल्हे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अकारण स्वार्थासाठी नख लावणे योग्य नाही. उगाच आता त्या वक्तव्याचा राईचा पर्वत करण्याची आवश्यकता नसल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.  टीव्ही9 मराठीशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नारायण गाव खेड बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन कोल्हे आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये श्रेयवादाची सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तमपणे काम करत आहेत. पण उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन अकारण मित्र पक्षावर टीका होत असेल तर ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, एव्हढंच ते वक्तव्य असल्याचं कोल्हे म्हणाले. त्यासोबतच महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या सर्वांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली आहे, असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमोल कोल्हेंनी औकात पाहून बोलावं, हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तिला विठ्ठल माफ करणार नाही”

इंजेक्शन पाहून लहान मुलासारखी रडायला लागली महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

चुकीला माफी नाही!, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

‘…त्या शाखाध्यक्षाच्या घरी स्वत: जेवायला जाणार’; राज ठाकरेंची अनोखी ऑफर

जनतेच्या सेवेत समर्पित, म्हणत राज्यमंत्री झाल्यावर भारती पवार संसदेत जाताना नतमस्तक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More