Top News पुणे महाराष्ट्र

आढळराव-कोल्हेंमधला वाद पेटला, आता अमोल कोल्हे म्हणतात…

पुणे : लोकांना माझ्याबाबत चुकीची माहिती सांगून भावनेचं राजकारण केलं… कुठं आहेत ते आता?? ते जिथे जातायेत तिथले लोकं पक्ष सोडून चाललेत, असं म्हणत शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंवर टीकास्त्र सोडलं होतं. अमोल कोल्हेंनी आढळरावांच्या या टीकेला  प्रत्युत्तर दिलं आहे.

आढळराव पराभवाच्या नैराश्यातून बोलत असून जनतेनं त्यांनी दिलेल्या सक्तीच्या निवृत्तीचा त्यांनी आनंद घ्यावा, असं प्रत्युत्तर अमोल कोल्हेंनी दिलं आहे.

शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादीही संपेल, अशी घणाघाती टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंवर केली होती.

अमोल कोल्हेंना निवडून देऊन लोकांना पश्चाताप झालाय. त्यांनी मतदारसंघात भावनेचं आणि जातीय समिकरणाने राजकारण केले, असा आरोप आढळरावांनी कोल्हेंवर केला होता. याचाच अमोल कोल्हेंनी समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या