मुंबई | उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील बलात्कारी पीडितेच्या कुंटूंबाला काँग्रेस नेते राहुल गांधी भेट घेण्यासाठी आले होते. मात्र युपी पोलिसांनी गांधी यांना धक्काबुक्की करत त्यांच्या कॉलरवर हात टाकला आणि त्यांना अटकही केली.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अशा पद्धतीने वागणूक देणाऱ्या हिटलर शाहीचा करावा तितका निषेध कमीच आहे. भाजपच्या विनाशी वाटचालीस सुरुवात झाली. अशा मस्तवाल सरकारचा धिक्कार, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
श्री राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांना अश्या पद्धतीने वागणूक देणाऱ्या हिटलर शाहीचा करावा तितका निषेध कमीच आहे. भाजपाच्या विनाशी वाटचालीस सुरुवात झाली.
अशा मस्तवाल सरकारचा धिक्कार pic.twitter.com/Jj7Kz54Dji— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 1, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘हाथरसमधली घटना पाशवी! महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?’; राज ठाकरे कडाडले
रामाचं नाव घ्यायचं आणि कृती मात्र नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत- जयंत पाटील
‘…आता तरी चाचण्या वाढवा’; फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
राहुल गांधींवर बळाचा वापर करणाऱ्या युपी पोलिसांना निलंबित करा- विद्या चव्हाण