“इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”
मुंबई | शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेल्या संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचं खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं. आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यास विरोधी पक्षाने आता सुरूवात केली आहे. विरोधकांच्या या टीकेला राष्ट्रवादीेचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप सुडाचं राजकारण करत आहे मूळ विषयाला बगल देण्याचं काम भाजप करत आहे. भाजपने कालपर्यंत संजय राठोड प्रकरण उचलून धरलं. आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केवळ पेट्रोल-डिझेलसह इतर मुद्द्याला बदल देण्यासाठी भाजप काहीही आरोप करत असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
संजय राठोड यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वासर्वा शरद पवार यांना टोला लगावत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप नेत्या पंकजा मुडेंनीही धनंजय मुंडेवर निशाणा साधला.
दरम्यान, धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
‘मुंबईतील त्या दिवशीच्या ‘बत्तीगुल’मागे चीनचा हात?’; ऊर्जा मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
देशातील ‘या’ 6 शहरांमध्ये रंगणार आयपीएलचा थरार
दम लगा के हैशा! मेरोलिनच्या पुशअप्स चॅलेंजवर राहुल गांधींचा दस का दम, पाहा व्हिडीओ
पुण्यातील ‘या’ ठिकाणी गजा मारणेला वडापाव खाणं पडलं महागात; झाला गुन्हा दाखल
‘पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी घेतले’; शांता राठोडांच्या आरोपावर लहू चव्हाणांनी सोडलं मौन, म्हणाले..
Comments are closed.