बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अहो पाटील, नरेंद्र मोदी आणि अमित शहांना माहित आहे अजित पवार काय आहेत”

मुंबई | आमचे नेते देवेंद्रजी दबंग नेते आहेत. ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. देवेंद्रजी उद्धव ठाकरे यांच्यासारखे नाहीत, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या टीकेला विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अहो, पाटील अख्या भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना माहित आहे की अजितदादा काय आहेत?, तुम्ही काय 100 अजित पवार खिश्यात बाळगल्याची भाषा तुम्ही काय करताय, तुमच्या सहित 105 आमदार अजितदादांनी तेव्हाच गुंडाळले ज्यादिवशी राष्ट्रपती राजवट उठवली, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

अमोल मिटकरींनी व्हिडोओद्वारे टीका केली आहे. त्यासोबतच मिटकरींनी व्हिडीओमध्ये एक गाणंही म्हटलं आहे. तुम्हाला पाहून मला पिंजरा चित्रपटातील गाणं आठवतं, कुण्या गावाची गं, कुण्या राजाची गं राणी, हे गाणं म्हणत तुम्ही अजितदादांचा नाद करू नका, असंही अमोल मिटकरी यांनी म्हणाले.

दरम्यान, स्वतंत्र मतदारसंघात शोधत तुम्ही एका प्रामाणिक महिलेचा राजकीय बळी घेतला आहे. कोल्हापूरमध्ये चप्पल दाखवल्यामुळे तिथून पळावं लागलं. आता पुणेरी मिसळ खायची असेल तर तुम्ही आणि देवेंद्र फडणवीसांनी नादाला लागावं, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘ब्युरोक्रेसी काहीच नाही, ते आमच्या चपला उचलतात’; उमा भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य

किरीट सोमय्या ईडीचे प्रमुख आहेत का?- सुप्रिया सुळे

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More