बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे दगड फेकून अंगावर घाण उडवून घेतल्यासारखं”

मुंबई | जातीयवादाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचं महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणं आहे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

जातीयवादाची सुरूवात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर झाल्याचं राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवारांना यावर बोलताना राज यांना त्यांच्या आजोबांची पुस्तके वाचायला सांगितली होती. यावर आज राज ठाकरे यांनी बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

दरम्यान, आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी पवारांना टोला हाणला.

 

थोडक्यात बातम्या- 

“सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला”

‘औवेसींना त्यांच्या महिला….’; अफगाणिस्तानसोबत भारताची बरोबरी केल्याने केंद्रीय मंत्री संतापल्या

निलेश लंकेंवर कारवाई?; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

‘नाशिकच्या विमानतळाला ‘हे’ नाव देण्यात यावं’; रामदास आठवलेंची नवी मागणी

“सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं आवश्यक आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More