बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दगडफेक केली त्याला योग्य उत्तर दिले जाईल, ही भाजपसाठी धोक्याची घंटा”

मुंबई | बुधवारी सोलापूरमध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि गोपीचंद पडळकर यांच्यात संघर्ष पेटला आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे यांनी भाजपला इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी पक्ष अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याला घाबरत नाही. मात्र ज्या दोनचार लोकांनी दगडफेक केली असेल त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल. येणाऱ्या काळात भाजपसाठी ही धोक्याची घंटा असणार आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

जिकडे कोणीच नाही. निर्मनुष्य ठिकाणी एक दोन कार्यकर्ते सोडून दगड मारुन मी वंचितांचा लीडर आहे, असं भासवण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी पक्ष अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याना घाबरत नाही. मात्र त्यांच्या दोनचार लोकांनी जी दगडफेक केली असेल त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाणार असल्याचं म्हणत कोल्हेंनी भाजपला इशाला दिला आहे.

दरम्यान, पडळकरांच्या गाडीवर हल्ला करणारा तरूण हा धनगर समाजाचा असल्याची माहिती समजत असून त्या तरूणाचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत फोटो पडळकरांनी पोस्ट केला आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड करताना गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत होते.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं दाखल केलेली पूनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

‘गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचा पडळकरांना पाठींबा

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय झालं? पवार म्हणाले…

गोपीचंद वि. राष्ट्रवादी संघर्ष पेटला??; गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More