बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उस्मानाबादच्या डान्स बारवरून अमोल मिटकरी आक्रमक, म्हणाले…

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील डान्सबारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावरूनच आता आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. तुळजापूर येथे एकीकडे आपण स्त्री शक्तीचा जागर करत असताना दुसरीकडे अशा प्रकारे डान्स बार सुरू असणं लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डान्स बार सर्रास सुरु असून तुळजापुरमधील या प्रकाराचा निषेध व्यक्त करत आमदार अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा आगामी अधिवेशनात मांडणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरही त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून सध्या चांगलंच राजकारण पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना शहरांची नावं बदलून विकास होत नसल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर ज्यांना नावं बदलायची आहेत त्यांनी गुजरातमधील नावं बदलून घ्यावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

सध्या डान्स बारचा मुद्दा चर्चेला आला असताना आता अमोल मिटकरींनी या मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला असल्याने यावर ते पुढे काय भूमिका घेणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

आर्यन खान प्रकरणात खळबळ माजवणारा तो व्हिडीओ संजय राऊतांकडून शेअर

दुबईही झाली मालामाल! भारत-पाक सामन्यासाठी तब्बल ‘इतका’ तिकीट दर

शरद पवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात, दिवाळीनंतर राजकीय समीकरण बदलणार?

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, एनसीबी पंचानेच केले समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

माही ‘हा’ सामना नको जिंकू म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या तरूणीला धोनीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More