“…तर निवडणूक स्वतंत्र लढावी लागेल”; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य

Amol Mitkari | लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. लोकसभा निवडणुकीचा निकाल देखील समोर आला. महायुतीला म्हणावं असं यश मिळालं नाही. अशातच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.  प्रत्येकाला वैयक्तिक जर 100 जागा लढवायच्या झाल्या तर निवडणूक स्वतंत्र लढवावी लागेल, असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केलं आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

“मला असं वाटतं की राष्ट्रवादीने केवळ 100 जागा लढवाव्यात असं ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल. 55 जगा जर महायुतीला भेटत असतील तर त्यात आम्ही समाधानी असू असं नाही. महायुती आणि महाविकास आघाडी म्हणतात आम्ही 100 100 जागा लढून 288 मतदारसंघ आहेत.”, असं अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले आहेत.

महायुतीच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आवर घालावं, असं वाटत असेल तर मग शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भाजप प्रविण दरेकर असतील यांना सुद्धा त्या त्या पक्षाने लगाम घालावा. चंद्रकांत पाटील आणि माझा फोनवर संवाद झाला. काल त्यांनी वक्तव्य केलं असता मी त्यांना उत्तर मागितलं. तुमच्या वेळी छुपा राजाश्रय होता का? मग त्यांनी मला फोनवर सांगितलं आणि महायुतीत विसंवाद नको. आपण तिन्ही एकत्रित असावं, असं सांगितलं असल्याचं अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

“मिटकरींनी पक्षश्रेष्ठींना विचारून बोलावं”

महायुतीत बोलत असताना मिटकरींनी पक्षश्रेष्ठींना विचारून बोलावं असा महायुतीच्या नेत्यांचा सूर आहे. अमोल मिटकरी यांना जागा वाटपाच्या केलेल्या विधानावर शंभुराजे देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले, महादेव जानकर बसून ठरवतील. अशी वक्तव्य करुन विनाकारण महायुती मध्ये गैरसमज निर्माण होतात. गैरसमज निर्माण होईल असेही वक्तव्य करू नयेत. महायुतीतील अधिकाऱ्यांना ज्यांना किती जागा कोणाला द्यायच्या हे आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हे एकनाथ शिंदेंकडे दिलेले आहेत, असं शंभुराज देसाई म्हणाले.

News Title – Amol Mitkari Big Statement About Mahayuti

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, मृताच्या आईचा संताप

“मुंबई से आया मेरा दोस्त…”, राशिद खानची रोहित शर्मासाठी पोस्ट

1 जुलैपासून ‘हे’ नियम बदलणार; सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री?

“राजर्षी शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या”; ‘या’ नेत्याने केली मागणी

आनंदाची बातमी! वनप्लस कंपनीने लाँच केला भन्नाट फीचर्ससह स्मार्टफोन