सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) परिवार संवाद यात्रा पाचवा टप्प्यात सांगलीतील इस्लामपूर येथे पोहोचली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह भाजपवर (BJP) देखील जोरदार निशाणा साधला.
महाराष्ट्रात जोरजोरात बोलण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपची एक टीम त्यासाठी तयार झाली आहे ती फक्त शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बोलण्यासाठी, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हिमालयात जाणार होते त्याचं काय झालं?, असा खोचक सवाल देखील मिटकरींनी उपस्थित केला.
तुम्ही फुले, शाहू महाराजांचे नाव घेता मग फोटो कोणाचा लावता? राज ठाकरेंना फुले, शाहू, आंबेडकरांची अॅलर्जी आहे का? असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला आहे. तर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) बाबासाहेब पुरंदरेंचा खरा चेहरा समोर आणला असल्याची टीकाही मिटकरींनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे म्हणतात भोंगे लावले तर हनुमान चालिसा वाजवू. अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्यापासून सावधान राहा. भाजपवाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, ती आम्हालाही माहिती आहे, असा घणाघात मिटकरींनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
प्रशांत किशोर यांचा फाॅर्म्युला ठरला! महाविकास आघाडीबाबत काँग्रेस हायकमांडला दिला ‘हा’ सल्ला
‘राज ठाकरेंचं समर्थन भाजपला महागात पडेल’; केंद्रीय मंत्र्याचा भाजपला सल्ला
मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार; ‘या’ नेत्यांची नावे वगळली
…अन् भर मंडपात नवरीने नवऱ्याच्या कानशिलात लगावली; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
ऐन उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला का भिडले?, वाचा सविस्तर
Comments are closed.