बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बहुतेक सदाभाऊंच्याच #*# आग लागली असावी’; पवारांवरील टीकेनंतर मिटकरी भडकले

मुंबई | रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली. शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं. त्यामुळे त्यांचं आडनाव बदलून आगलावे करा, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.

सदाभाऊ खोत यांच्या या टीकेवरून राष्ट्रवादीचे आक्रमक नेते व आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सदाभाऊ खोत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बहुतेक सदाभाऊंच्याच *** आग लागली असावी. कुठला शब्द आहे तो मला चॅनेलसमोर म्हणायचा नाही, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे.

आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलताना शेवटी तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते, एवढं ज्ञान सदाभाऊंना असावं. मात्र त्यांना आमदारकी टिकवायची आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

दरम्यान, सदाभाऊ खोत असतील किंवा त्यांचा मित्र असेल ते स्वत: बोलत नाहीत. त्यांचा मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे आणि हे माझं स्पष्ट मत आहे, अशी खरमरीत टीका देखील मिटकरी यांनी केली आहे. तर भाजपच आग लावायचं काम करत असल्याची टीका देखील मिटकरी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपसोबतच्या मैत्रीवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

“शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं, त्यांचं नाव आगलावे करा”

Weather Update: येत्या पाच दिवसांत ‘या’ भागात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनचं कोट्यवधींचं नुकसान, ‘ही’ आकडेवारी समोर

“भाजपच्या काळ्या जादूचा आमच्यावर प्रभाव पडणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More