मुंबई | अस्पृश्यता निवारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान मोठं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ आहे, असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं होतं. यावरुन वादविवाद सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी यावरुन पोंक्षे यांना लक्ष्य केलं आहे.
पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो, अशी बोचरी टीका मिटकरी यांनी केली आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना पोक्षेंनी वरील वक्तव्य केलं होतं. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. पोंक्षेवर सर्व स्तरांतून टीका होताना दिसत आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही पोंक्षे यांच्यावर टीका केली आहे. अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं योगदान फुले-आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ असणं असं म्हणणे म्हणजे अभिनयात अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यापेक्षा शरद पोंक्षेंचं योगदान श्रेष्ठ म्हणण्यासारखं आहे, असा टोमणा त्यांनी मारला आहे.
पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो.
— Amol mitkari (@amolmitkari22) March 1, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
बेडुक कितीही फुगला तरी… आशिष शेलारांची ‘राष्ट्रवादी’वर जहरी टीका
शिवसेना पक्ष नंबर वन राहिला पाहिजे- अजित पवार
महत्वाच्या बातम्या-
औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंचा विरोध
“हौशे-नवशे-गवश्यांना दोन वर्ष कुठलेही पद देऊ नका”
अहो..सरकार आणलं यांनी, ‘सामना’चं संपादकपद तरी द्यायचं होतं- रामदास आठवले
Comments are closed.