अकोला महाराष्ट्र

“भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल”

अकोला | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली. यात महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला हार पत्करावी लागली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.

अन होनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगाह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, म्हणून या महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील वातावरण आता बदललं आहे. भाजपच्या अदप पथनाला आजपासून सुरुवात झाली आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

अमरावतीत भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का; अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

“अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला”

“एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली”

तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून 50 लाख रुपये जाहीर!

राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या