मुंबई | तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवा, असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीसांचा जोरदार समाचार घेतला आहे.
अहो फडणवीस, हिंमतीची भाषा करायला जिगर लागतं. हिम्मत कुणाची काढताय?? परत निवडणुका लागल्या तर पडता भुई थोडी होईल, असा टोला अमोल मिटीकरी यांनी फडणवीसांना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
नशीब 105 वर अडकून आहात परत खेटलात तर 15 पण निवडुन येणार नाहीत, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, ऊतू मातु नका तसेच आता 5 वर्ष फक्त ओरडत रहा, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
हिम्मत कुणाची काढताय?? परत निवडणुका लागल्या तर पडता भुई थोडी होईल. “ऊतू मातु नका ” नशीब 105 वर अडकून आहात, परत खेटलात तर 15 पण निवडुन येणार नाहीत. हिंमती ची भाषा करायला जिगर लागते. आता 5 वर्ष फक्त ओरडत रहा. @TV9Marathi @Saamanaonline
— Amol mitkari (@amolmitkari22) February 16, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
केंद्राने पैसे थकवल्यामुळेच राज्यापुढे अर्थिक अडचणी- सुप्रिया सुळे
आर. आर. आबा आणखी 20 वर्ष राजकारणात पाहिजे होते- इंदुरीकर महाराज
महत्वाच्या बातम्या-
चांगल्या डॉक्टरकडे जाण्याची गरज; नवाब मलिकांचा भाजप नेत्यांना सल्ला
मोर्चा, आंदोलनं करु नका; इंदुरीकर महाराजांचं चाहत्यांना आवाहन
“मोदी मोठे ‘विकासपुरुष’, त्यांच्या आधी कोणीच एवढा विकास केला नाही, नंतरही कोण करणार नाही”
Comments are closed.