बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपचं ओबीसी आरक्षणासाठीचं आंदोलन म्हणजे, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना”

मुंबई | ओबीसींचं राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्याविरोधात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर समाज रस्त्यावर उतरून तीव्र रोष व्यक्त करत आहे. तर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. त्या आंदोलनावर आता राष्ट्रवादीने टीका करण्यास सुरवात केली आहे.

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत असताना भाजपला मात्र सोयीने छत्रपती शाहु महाराज यांचा विसर पडलेला दिसतोय. सुडबुद्धीने वागणारी भाजपची मंडळी किती दुटप्पी आहेत हे यावरून दिसते. आंदोलन आपला हक्क आहे मात्र, सोयीचं राजकारण जास्त दिवस टिकत नसतं. भाजपचं ओबीसी आंदोलन म्हणजे, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणासाठी कोर्टाची लढाई एका बाजूला सुरु असून सरकार सर्व सहकार्य करत आहे. मात्र ओबीसी समाजातील नागरिकांना नेमकं आरक्षणांच गणित कळालेलं नाही. ते आधी समजून घेणं महत्वाचं असून आम्ही लवकरच यावर योग्य पावलं उचलणार आहोत. सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रात होत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात अनेक भाजप कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे. ठाण्यात देखील भाजपातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. पण आंदोलन सुरू होण्याआधीच भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारचा करदात्यांना माेठा दिलासा; अनुराग ठाकूर यांनी दिली महत्वाची माहिती

कोरोना लस न घेणं पडू शकतं महागात; धक्कादायक माहिती आली समोर

“अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!”

कोण राजे?, मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

मोठी बातमी! अनिल देशमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More