Maharashtra Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. उद्या 23 नोव्हेंबररोजी निकाल लागतील. त्यापूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीसह महायुतीच्या बैठका रंगत आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार असला तरी यंदाच्या निवडणुकीत अपक्षांची भूमिका देखील तितकीच महत्वाची ठरणार आहे. कारण, अनेक पोल्समध्ये कुणालाही बहुमत मिळणार नाही, असे अंदाज बांधण्यात आले आहे. (Maharashtra Vidhan Sabha)
त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाच्या रूपात कोण मिळणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. अशात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका आमदाराने एक मोठा दावा केला आहे. या दाव्याची आता राज्यभर चर्चा रंगली आहे.अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठा दावा केला आहे.
अमोल मिटकरी यांचा दावा
राज्यात कुणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे एकहाती सत्ता कुणाचीच येणार नाहीये.तसेच महायुतीला 175 जागा किंवा महाविकास आघाडीला 110 जागा मिळणार, असं चित्र नसणार आहे. दोन चार जागांच्या फरकाने महायुतीला निसटता विजय मिळेल. फार मोठा विजय मिळणार नाही, तर निसटते सरकार स्थापन होईल असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. (Maharashtra Vidhan Sabha)
इतकंच नाही तर महायुतीत मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार, याबाबतही मिटकरी यांनी मोठं भाष्य केलं आहे. येत्या 25 नोव्हेंबररोजी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असा दावाही मिटकरी यांनी केला आहे. सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंग मेकर असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असंही मिटकरी म्हणाले आहेत. मिटकरी यांच्या दाव्याची आता चर्चा रंगली आहे.
उद्या लागणार निकाल
दरम्यान, 20 नोव्हेंबररोजी मतदान पार पडल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. काही पोल्समध्ये महाविकास आघाडी तर काही पोल्समध्ये महायुतीला यश मिळणार, असे अंदाज बांधण्यात आले आहेत. बऱ्याच पोल्समध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याची आकडेवारी देखील सांगण्यात आली आहे. मात्र, खरे चित्र हे उद्या 23 नोव्हेंबररोजीच स्पष्ट होणार आहे. (Maharashtra Vidhan Sabha)
News Title – Amol Mitkari on Maharashtra Vidhan Sabha result
महत्त्वाच्या बातम्या-
सोन्याचा दरवाढीला कौल, दोनच दिवसांत झाली ‘इतक्या’ हजारांची वाढ; पाहा आजच्या किंमती
महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एका एक्झिट पोलचा निकाल समोर
देवी लक्ष्मी ‘या’ राशीची झोळी सुख व पैशांनी भरवणार?, वाचा राशीभविष्य
महायुती सरकार घासून नाही तर ठासून येणार, ‘या’ नेत्याला विश्वास
अजितदादा ‘इतक्या’ मतांनी पडणार, बड्या नेत्याचा दावा