Top News पुणे महाराष्ट्र

“अमोल कोल्हेसारख्या व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरुन निघणार नाही”

पुणे | अक्षय बोऱ्हाडे आणि सत्यशील शेरकर यांच्यातील वाद अखेर सामोपचारानं मिटला आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

बोऱ्हाडे-शेरकर वादात राजकारण करु पाहणाऱ्या मंडळींना मिटकरी यांनी आपल्या निशाण्यावर घेतलं आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सहन कराव्या लागलेल्या मनस्तापावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे.

अखेर टोळधाड उघडी पडली. राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार, आमचे बंधू अतुलशेठ बेनके यांनी भक्तांची धारण चांगलीच पाचावर बसवली. विरोधकांनी एक कायम लक्षात ठेवावं इथे नमो भक्त नाहीत इथे राष्ट्रवादी आहे. तुम्ही कसेही चाल खेळलात तरी डाव जिंकणारे योद्धे इकडेच आहेत. शेवटी अख्या टोळधाडी वर अतुलशेठ यांनी फवारणी करून ट्रोल करणारे उघडे नागडे केलेत, असं ते म्हणाले.

एक खंत कायम मनात राहील ती म्हणजे या सर्व प्रकारात खासदार डॉ. अमोल कोल्हे सारख्या प्रामाणिक व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दात त्यांनी दुःख देखील व्यक्त केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

“जवळपास 28 हजार रुग्ण बरे झालेत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होतं”

महत्वाच्या बातम्या-

अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर मिटकरींची गरमागरम फेसबुक पोस्ट!

बॉलीवूडचा दिग्गज गायक कोरोनाने हिरावला, संपूर्ण बॉलीवूड शोकसागरात

परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या