महाराष्ट्र मुंबई

“आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील”

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

भाजपला विकासावर, महागाईवर, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलण्यास वेळ नाही. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्यास वेळ नाही, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केलीये.

केंद्र सरकारविरोधात असलेला रोष वळण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील करत आहेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, आम्ही जर तोंड उघडले तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे पडद्यासमोर यायला वेळ लागणार नाही, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबानी-अदानीसाठी काम करत आहेत”

“आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असणारा खरा नातू”

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत- रामदास आठवले

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी अटकेतील आणखी 89 आरोपींना जामीन मंजूर

“शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या