“महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील”
मुंबई | गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधून राजीनाम्याची घोषणा केली. तसेच त्यांनी आपल्या मंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन राजीनामा पत्र सुपुर्द केला.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी थेट भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
आज महाराष्ट्राने एक उत्तम व सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला. याची नोंद तरुणांच्या हृदय पटलावर कायम राहील महाराष्ट्राच्या जनमनात कायमचे स्थान मिळवणाऱ्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यास मनापासून दंडवत, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र! एक सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची जनता शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना कधीच विसरू शकणार नाही. कोरोना सारखी संकट, चक्री वादळ पेलणारे आपण, आज इतकेच सांगतो महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील, असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस-शिंदे यांच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला शपथ घेणार
“बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु”
मोठी बातमी! शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना इशारा
“चाणक्य आज लाडू खात असतील, सर पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहिल”
एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं दुसरीकडे बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट!
Comments are closed.