अकोला महाराष्ट्र

“महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केलीये”

अकोला | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.

अन होनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगाह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, म्हणून या महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

मी निवडून आलेल्या पदवीधर आणि शिक्षक महाविकासआघाडीतून सर्व उमेदवारांचे अभिनंदन. तसेच मी मतदारांचेही आभार व्यक्त करतो. मतदारांनी अहंकाराला मूठमाती देऊन महाराष्ट्राच्या मातीने महाविकासाघाडीचा विचार स्वीकारला, असंही अमोल मिटकरींनी सांगितलं.

दरम्यान, भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल”

अमरावतीत भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का; अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

“अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला”

“एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली”

तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून 50 लाख रुपये जाहीर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या