“यापुढे जर कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर…”
मुंबई | शरद पवारांबद्दल बोलताना त्यांनी भान ठेवावं आणि यापुढे जर कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी, मराठा आणि महाराष्ट्राची जनता फडणवीसांना माफ करणार नाही. फडणवीसांचं हे आग लावणारं वक्तव्य असून त्यांच्या कपटनीतींपासून महाराष्ट्राने सावध राहावं, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी भाजपवर निशाणा साधलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीसांनी आता महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत. कधीही उठसूठ शरद पवारांबद्दल काहाही बोलायचं, असंही अमोल मिटकरी म्हणालेत.
ज्ञानवापी मंदिर, ओबीसी आरक्षण आणि आता संभाजीराजेंच्या नावानेही राजकारण करुन मराठा, ओबीसी यांना पवारांविरोधात उभं करण्याचं आगलावे धंदे फडणवीसांनी बंद करावेत, असं मिटकरी म्हणालेत.
संभाजीराजेंनी कोणत्याही पक्षात जाणार नाही आणि अपक्ष निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी महाराष्ट्र स्वागत करेल, असं मिटकरी म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी पुन्हा येईन हे खरं करुन दाखवू, ते ही ब्रह्मदेवास चुकवून”
“बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार”
मोठी बातमी! कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली, सर्व कार्यक्रम रद्द
हसिना पारकरच्या मुलाचे ईडी चौकशीत डॉन दाऊद इब्राहीमबाबत धक्कादायक खुलासे!
शिवसेनेनं संभाजीराजेंना डावल्यानंतर मराठा संघटना आक्रमक; दिला गंभीर इशारा
Comments are closed.