महाराष्ट्र मुंबई

“राष्ट्रवादीच्या कार्यालयात या, सरकारच्या कामांचा ग्रंथ वाचायला देतो”

मुंबई | राज्य सरकारच्या वर्षभरातील कामांचा एक ग्रंथ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावं. त्यांना तो ग्रंथ वाचायला देतो, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं.

महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. सरकारमधील सर्व मंत्र्यांनी चांगले काम केले. सरकारने वर्षभरात महात्मा फुले कर्जमाफी योजना, शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत, कोरोना काळात शिवभोजन थाळी अशा अनेक योजना राबवल्या, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

राज्य सरकारच्या वर्षभरातील कामांचा एक ग्रंथ आहे. देवेंद्र फडणवीस यांना वेळ भेटला तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावे. त्यांना तो ग्रंथ वाचायला देतो, असं अमोल मिटकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“मोदींना लसींबाबतची खूप माहिती, ते अनेक लसींवर भरभरून बोलले” 

बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या नागनाथ गर्जेंच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुंडेंनी स्वीकारली! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा!

पवारांना  नोटीस आली अन् चित्रं बदललं, ईडीचा पायगुण चांगला- सुप्रिया सुळे

“फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या