“तुझी लायकी जनतेला माहितीये, घाणीत दगड मारायची सवय नाही आम्हाला”
मुंबई | कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (BY Election) निकाल लागला आहे. कसबा पेठेत भाजपला धक्का बसला तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला हादरा बसला. यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय.
पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली.
पिंपरी चिंचवड मध्ये एका महिलेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडला, मुत्र्या अजित पवार एक महिना पिंपरी चिंचवडला ठाण मांडून सुद्धा तुला एका महिलेने पाडला महिलेने, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावलाय. याला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
फारच चिल्लर झालास तु तर, आमच्या पक्षाच्या काही मर्यादा आहेत नाहीतर , तुझ्यापेक्षा खालची पातळी मला गाठता येते. तुझी लायकी जनतेला माहीत आहे. घाणीत दगड मारायची सवय नाही आम्हाला, असं मिटकरी म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.