“तू सटकला लेका, उंची आणि बुद्धी सारखीच आहे तुझी”

मुंबई | सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (MaharashtraBudget2023) सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात ट्विटरवर देखील नेत्यांमध्ये ट्विटवॉर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना लि. मुंबई या संस्थेच्या तज्ञ संचालक पदी अजित पवार यांची निवड झाली असं सांगत भाजप नेते निलेश राणेंनी अजित पवारांवर खोचक टीका केली.

अजित पवार आणि तज्ञ?? ऐकायला पण बरं वाटत नाही, असं म्हणत राणेंनी अजित पवारांवर टीका केली होती. राणेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, तू सटकला लेका… उंची आणि बुद्धी सारखीच आहे तुझी. तुझ्या ## खालच्या कमेंट वाचल्या की तुझी लायकी पण कळते. हॅशटॅग टिल्लू, अशा शब्दांत मिटकरींनी राणे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-