महाराष्ट्र मुंबई

“काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?”

मुंबई | मंदिरं उघडण्यासाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी तुळजापुरात आंदोलन केलं आहे. त्या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी तुषार भोसलेंवर निशाणा साधलाय.

साधूसंत म्हणजे नेमके कोण?, ते आंदोलन करणारे भोसले स्वतःला साधूसंत म्हणवून घेत आहेत. मग साधूसंतांची नक्की व्याख्या कोणती?, असा सवाल अमोल मिटकरींनी केला आहे.

काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?, अशी टीका अमोल मिटकरींनी तुषार भोसलेंवर केली आहे.

वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

दहावी-बारावीचे वर्ग ‘या’ तारखेपासून सुरु करण्याचा विचार; वर्षा गायकवाड

स्वत:ला अटक करणार का?;निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“शेतकऱ्याला दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा व हाताला चाटायचा”

नितीशकुमार यांनी दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाले…

पुण्यात महाविकास आघाडीला सर्वात मोठं यश; भाजपला मोठा धक्का!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या