बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रिपदाची. त्यानंतर त्यांचे दिल्ली दौर सुरु झाले. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्तारावरून त्यांनी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. तरी अद्याप त्यांचे खातेवाटप झाले नाही. त्यामुळे विरोधक त्यांना चांगलेच धारेवर धरत आहेत. आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

दोन मंत्र्यांचे हे सरकार लवकरच बरखास्त झालेले दिसेल आणि राज्यात मध्यावधी निवडणूका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) चांगली कामगिरी दिसेल आणि अजित पवार (Ajit Pawar)  यांना मुख्यमंत्री केले जाईल, असा विश्वास मिटकरींनी दर्शिविला. ते बारामती येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते.

सध्या राज्यात एका गटाकडून ऑफर सुरु आहेत. या गटाचे अध्यक्ष व्हा, मर्सडीज घ्या, दोन लाख रुपये महिना घ्या, दोन कोटी रुपये घ्या, असे म्हणत मिटकरींनी राज्यात सध्या बैलबाजारासंबधी सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर सुद्धा जोरदार टीका केली.

बंडखोर आमदारांच्या बंडामागे असंख्य कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे निधी देत नाहीत. मिटकरी यांनी यावर भाष्य केले. भाजपच्या एका आमदाराने सांगावे, त्यांना निधी दिला नाही. काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल असे म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांना 380 कोटींपेक्षा जास्त निधी दिला गेला. तरी आरोप करण्यात आले की, सगळा निधी बारामतीला पळविला, असे यावेळी मिटकरी म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

“संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”

शिंदे गट मनसेत विलीन होणार?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

पाचव्या मजल्यावरून चिमुकली थेट खाली, देवासारखा आला तरूण; चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद

‘संजय राऊतांनी हलकटासारखं सांगितलं इथून जा, तेव्हाच ठरवलं…’, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

‘त्या’ फोटोंमुळे सुष्मिता सेन सोशल मीडियावर ट्रोल!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More