पुणे | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाषणात ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ म्हणण्याऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ म्हटल्यामुळे नवा वाद सुरू झालाय. आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी-भाजप आपापसात भिडल्याचं पाहायला मिळत आहे.
या प्रकरणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. वाचाळवीर अजित पवार यांनी आधी संभाजी महाराजांच्या मुद्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या. आता क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा अपमान केला. आतातरी माफी मागणार की मग्रूरपणे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार, असा सवाल तुषार भोसलेंनी उपस्थित केला होता.
आता आमदार अमोल मिटकरी यांनी तुषार भोसले यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मिटकरींनी तुषार भोसलेंवर खोचक टीका केली आहे.
शाडीग्राम नावाच्या माकडाने दिवसा गांजा ओढायला सुरुवात केली आहे. हा कोणत्या पंथाचा आहे हे लवकरच सांगणार आहोत. कुठलाही धंदा नसल्याने हा नेहमीच अजित पवार यांच्यावर बोलत असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘या’ नेत्यांमुळे शिंदेंची खुर्ची धोक्यात?
- मोठी बातमी! आमदार योगेश कदमांच्या गाडीचा भीषण अपघात
- अमृता फडणवीसांच्या ‘आज मूड बना लेया’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
- आता जनावरांच्या लम्पी आजारावरही मिळणार लस; ‘या’ महिन्यापासून लस येणार बाजारात
- उर्फी प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकरांनी उचललं मोठं पाऊल