मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई (Mumbai) भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी आज दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांवर घणाघाती टीका केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती, असं अमोल मिटकरींनी सांगितलं.
राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवं होतं. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल. दुसरं असं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर सरकार कोसळले तर त्याअगोदरच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल, असंही त्यांनी म्हटलंय.
आज स्व. बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त मी साकडे घालतो की, त्यांना लवकर सदबुद्धी मिळो आणि लवकर महाराष्ट्र सोडून त्यांनी राज्याला मोकळं करावं, असं अमोल मिटकरी म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!
- ”बाळासाहेब मला माफ करा, शेवटच्या क्षणी मी तुम्हाला भेटू शकलो नाही”
- मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार?
- “दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणाऱ्या अवलादींना गाडून…”
- “गद्दारांना आणि गद्दारांच्या राजकीय बापांना आव्हान आहे, निवडणूक घ्या”