“खंजीर कुठे कुठे घुसलाय हे एकदा तपासून बघावं लागेल”
मुंबई | पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. दुसरा अजित पवारांनी, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटातील नेत्यांनी भाष्य करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना सुनावलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते वारंवार आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी भाषा करत आहेत. यांच्या पाठीत खंजीर कुठे कुठे घुसला आहे एकदा तपासून बघावं लागेल, असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटायला लागलं आहे. योग्य वेळी तुमच्या पाठीवरचे घाव जनताच मोजेल, काळजी नसावी, असा खोचक टोला अमोल मिटकरींनी लगावला आहे.
दरम्यान, पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांना देखील होती, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.