पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अमोल मिटकरींची मोठी घोषणा, आता…

Amol Mitkari | अजित पवार यांनी पक्ष आणि घड्याळ या चिन्हावर दावा सांगितल्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांचं आहे असा निकाल दिला. निकालावरून काही ठिकाणी जल्लोष तर काही ठिकाणी आक्रोश पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक मोठी माहिती दिली आहे. त्यांच्या पक्षाचं एक गाणं लवकरच मतदारांच्या भेटीला येणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी पक्ष फूटीच्याआधी ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्यानं अगदी विरोधकांच्या मनावर गारूड घातलं होतं. आता दोन गट पडून खरा पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आता यावर आणखी एक गाणं येणार आहे. याबाबत अजित पवार निर्णय घेणार आहेत. या गाण्याचं शीर्षक देखील मिटकरींनी (Amol Mitkari) सांगितलं होतं.

अमोल मिटकरींनी केली मोठी घोषणा

आगामी लोकसभा निवडणुका येत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानं आता पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांचं असल्यानं यानिमित्तानं आम्ही नवीन गाणं लाँच करणार आहे. “घड्याळ तेच फक्त वेळ नवी” असं त्या गाण्याचं शीर्षक आहे. अजित पवार यांच्या परवानगीनं आम्ही लवकरच हे गाणं लाँच करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

पक्ष कार्यालयावर ताबा घेऊ

“निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे. त्यानुसार आम्ही पक्षाचे कार्यालय ताब्यात घेणार आहोत. याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. अजित दादा जे सांगतील ती दिशा योग्य ठरवली जाणार आहे. वेळ पडली तर पक्षाच्या कार्यालयावर ताबा घेऊ”.

उरलेले आमदारही आमच्याकडे येतील

मुंब्राचे भाई आणि शंजय राऊ यांना आता काही कामं राहिली नाहीत. त्यामुळे आता त्यांना काय गडबड करायची आहे ती गडबड करु द्या. सध्या आमच्याकडे 50 आमदार आहेत. येत्या काळामध्य आणखी आमदार वाढतील. जे उरले सुरले आमदार तेही इकडं येतील, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

अमोल मिटकरी हे बोलत असताना शरद पवार गटातील नेत्यांना राखीव जागा ठेवण्यात आली असल्याचं म्हणाले होते. “शरद पवार गटातील उरलेले नेते देखील आमच्याकडे येतील. जेव्हा ते येतील त्यावेळी महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा मोठी गोष्ट पाहतील”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

News Title – Amol Mitkari Talk About NCP new Song

महत्त्वाच्या बातम्या

“महाराष्ट्राला दिल्लीकडून मिळणारा दगा नवा नाही, कालही आणि आजही…”

प्रसिद्ध अभिनेत्याकडून शरिर सबंधाची मागणी, अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

‘कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतात’; वसंत मोरेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसने खळबळ

ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर!

राज्यातील निवासी डॉक्टरांचा गंभीर इशारा; सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या