बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित दादा, बच्चू कडूंना समज द्या- अमोल मिटकरी

अकोला | अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या गावी म्हणजे कुटासा येथे मतदान केलं. त्यावेळी बोलताना मिटकरी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला.

राज्यात आपण एकत्र आहोत पण अकोल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराविरोधात बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष भारतीय जनता पक्षासोबत जात असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पालकमंत्री बच्चू कडूंना समज द्यावी, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

पोटनिवडणुकीसाठी मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

दरम्यान, राज्यांमध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी पोटनिवडणुका पार पडत आहे. वाशिम, धुळे, नंदुरबार, अकोला आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या आणि या सर्व जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या काही पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकाही पार पडत आहेत. याबरोबरच पालघर जिल्हा परिषदेच्या काही जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

…म्हणून सपना चौधरीने आपल्या लेकाला दिलंय राजाचं नाव, पाहा व्हिडीओ!

‘देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का?’; लखीमपूर घटनेवरून संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल!

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

‘माझ्या वडिलांना…’; एनसीबीकडे शाहरूख खानबाबत आर्यनने केलं मोठं वक्तव्य!

तालिबान्यांच्या ‘या’ नव्या फतव्यामुळे अफगाणिस्तानमधील तरूण मोठ्या संकटात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More