Top News महाराष्ट्र मुंबई

अहो दादा, असं मुघलांसारखं काय बोलता?- अमोल मिटकरी

मुंबई | औरंगाबादच्या शहराच्या नामंतरावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगली आहे. अशातच मिटकरी यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अहो दादा, बिहारमध्ये पण औरंगाबाद नावाचं शहर आहे असं म्हणतात. त्याबद्दल भाजप सरकार काही बोलणार आहे की नाही?, असं मोघलांसारखं काय बोलता, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

“छत्रपती संभाजी महाराजांचं” नाव विमानतळाला देणाऱ्या प्रस्तावास केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?, असा सवाल करत मिटकरींनी पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील मिटकरींच्या टीकेवर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात”

राज्य सरकारच्या ‘त्या’ चुकीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे- रावसाहेब दानवे

विधान परिषद निवडणुकीत गैरप्रकार झाला, मतदान EVM मशीनवर घ्या- चंद्रकांत पाटील

“दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास त्याचं नक्कीच स्वागत करु”

औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय; मुख्यमंत्र्यांचं केंद्राला पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या