बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमित शहा चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात हे माहित नाही”

मुंबई | भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट पत्र लिहिलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना टोला हाणला आहे.

अमित शहा हे चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात हे मला माहित नाही. महाराष्ट्रात सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. त्यांचं पत्र किती गांभीर्याने घ्यावं हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेण्याची भाषा केलेलीच आहे. त्यामुळे आपले शिलेदार पक्षात रहावं म्हणून ही भाषा असल्याचा टोलाही मिटकरी यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीका केली आहे.

दरम्यान, ज्या व्यक्तीने बिरोबाची शप्पथ खाऊन स्वतःच्या समाजाला फसवलं आहे. त्यांच्यावर देवस्थान भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एका म्हाताऱ्या महिलेची जमीन बळकावणं आणि मंगळसूत्र चोरीचाही गुन्हा त्यांच्यावर आहे. ती व्यक्ती एक प्रवृत्तीच आहे. अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत याचं आत्मचिंतन भाजपने करावं, असं म्हणत मिटकरींनी पडळकरांवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

चिंताजनक! डेल्टा प्लसनंतर कोरोना रूग्णांमध्ये वाढतोय ‘हा’ नवा धोका

…..अन्यथा ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरेल – डॉ. अजित नवले

“भाजपमधील काहीजणांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यातील एक पडळकर”

‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त?; आज एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, तर अवघ्या 25 नव्या बाधितांची नोंद 

निष्काळजीपणा! कामावर डॉक्टर न आल्यामुळे 12 कोरोना रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More