औरंगाबाद | आम्हाला महापालिकेत सत्ता द्या पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे.
औरंगाबाद मनपाची सत्ता हातात द्या, सत्ता आल्यावर “संभाजीनगर” नाव देऊ असं वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील जी, आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चे नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
इतक्या वर्षांपासून सत्ता भोगुन ‘अहमदाबाद’ नाव बदलता येत नाही का?, असा सवाल मिटकरींनी भाजपला केला आहे. यांदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, अमोल मिटकरींनी केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
औरंगाबाद मनपा ची सत्ता हातात द्या, सत्ता आल्यावर “संभाजीनगर” नाव देऊ असे वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील जी, आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद” चे नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो.
इतक्या वर्षांपासून सत्ता भोगुन ‘अहमदाबाद’ नाव बदलता येत नाही का !— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 5, 2021
थोडक्यात बातम्या-
कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही- आरोग्य मंत्रालय
मेहबूब शेख प्रकरणात मला पोलिसांची बाजू संशयास्पद वाटते- चित्रा वाघ
शिवसेना ही नाटक कंपनी आहे- देवेंद्र फडणवीस
‘तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकेल ; भाजप खासदाराला विश्वास
‘महिलांना फक्त सन्मान आणि प्रेमाची गरज तुमच्या पगाराची नाही’; कंगणाचा शशी थरूर यांच्यावर निशाणा