बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपमधील काहीजणांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यातील एक पडळकर”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणावरून भाजप नेते ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना धारेवर धरत टीकास्त्र सोडलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. यावरून मिटकरांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे.

भाजपमधील कोणतीही व्यक्ती अशा पद्धतीने खालच्या पातळीवर प्रतिक्रिया देत नाही. पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. भाजपमधील दोन-चार जणांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे त्यामधील पडळकर हे एक आहेत. त्यांची ही बेताल वक्तव्य येत आहेत त्यावर गांभीर्याने लक्ष देणं योग्य वाटत नाही, असं म्हणत मिटकरींनी पडळकरांना फटकारलं आहे.

दरम्यान, ज्या व्यक्तीने बिरोबाची शप्पथ खाऊन स्वतःच्या समाजाला फसवलं आहे. त्यांच्यावर देवस्थान भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एका म्हाताऱ्या महिलेची जमीन बळकावणे आणि मंगळसूत्र चोरीचाही गुन्हा त्यांच्यावर आहे. ती व्यक्ती एक प्रवृत्तीच आहे. अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत. याचं आत्मचिंतन भाजपने करावं, असा खोचक सल्ला मिटकरींनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अजित पवार आणि अनिल परबांचे मनसुख हिरेन आणि स्फोटक प्रकरणातील वाझेशी संबंध”

पुण्यात आता वस्ती तिथे लसीकरण; महापालिकेचा मोठा निर्णय

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत”‘

रणवीर सिंहचा नवीन लूक पाहून चाहते झाले सैराट, पाहा फोटो

आज सोनं तब्बल 460 रुपयांनी घसरलं, तर चांदी देखील उतरली; वाचा ताजे दर

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More