मुंबई | दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर सरकारच्या समर्थनार्थ भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि गाणकोकिळा लता मंगेशकर यांनी ट्विट केलं होतं. यावरून सचिनला आणि लता मंगेशकर यांना चाहते ट्रोल करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे मग मंगेशकर असोत की तेंडुलकर, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असच बोलावं, वागावं आणि लिहावं, असा सल्लाही मिटकरींनी लगावला आहे.
दरम्यान, फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचुन घ्यावा, असा टोलाही मिटकरी यांनी फडणवीसांनी लगावला आहे.
सेलिब्रिटींच्या ट्वीट ची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर!
‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असच बोलावं वागावं व लिहावं.फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचुन घ्यावा.— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 9, 2021
थोडक्यात बातम्या-
गेहना वशिष्ठ अश्लील व्हिडीओ रॅकेटप्रकरणी मोठा खुलासा, बड्या अभिनेत्रीचा नवरा…
“…त्यावेळी गुलाम नबींना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र…”; पवारांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा
अश्रुजीवी!!! काॅंग्रेस नेत्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर
‘त्या’ आत्महत्या केलेल्या तरुणीचे मंत्र्यासोबत प्रेमसंबंध?; पोलीस काय म्हणाले???
सरकार शोधतंय स्वयंसेवक करावी लागणार ‘ही’ कामं