मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या इस्लामपुर येथील भाषणानं राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ब्राम्हण समाजानं ठिकठिकाणी मिटकरींच्या निषेधार्थ आंदोलन केली आहेत. त्यानंतर आता मिटकरींनी माफी मागण्याच्या मागणीवर आपलं मत माडलं आहे. अमोल मिटकरी एका अटीवर माफी मागायला तयार आहेत.
मी कोणत्याही पक्षाबद्दल आणि जातीबद्दल बोललेलो नाही, ज्यांना वाटत असेल मी माफी मागावी त्यांनी अगोदर जिजाऊंची माफी मागावी मी माफी मागायला तयार आहे, असं मिटकरी म्हणाले आहेत. परिणामी मिटकरी यांनी माफी मागायला स्पष्ट नकारच दिल्याची चर्चा राज्यात रंगली आहे. राष्ट्रवादीकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
मी कोणत्याही धर्माविरूद्ध आणि जातीविरूद्ध बोलणारा व्यक्ती नाही. कारण मी भारतीय राज्यघटनेचा मान राखणारा व्यक्ती आहे, असं मिटकरी म्हणाले आहेत. फक्त भाजपप्रणित काही संघटना विरोधात उतरल्या आहेत, राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यासाठी राजकारण चालू आहे, असं म्हणत मिटकरींनी विरोधकांवरच हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, अमोल मिटकरींच्या भाषणावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. त्यांनी या वक्तव्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य हे वैयक्तित असल्याचं पाटील म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या –
“कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर…”, जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी
“कधीही निवडणुका घ्या, विजय आमचाच होणार…सत्ता भाजपचीच येणार”
अमोल मिटकरींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत मनसेचं जोरदार प्रत्युत्तर; पाहा व्हिडीओ
महागाईवर ‘ऑल इस वेल’ म्हणणाऱ्या अर्थमंत्री सीतारामण यांच्यावर राष्ट्रवादीची जोरदार टीका!
“मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणारच…”, नवनीत राणा कडाडल्या
Comments are closed.